भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा वेग आता प्रचंड वाढला आहे. काही दिवसांतच होणाऱ्या या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपचे माजी नगरसेवक विलास मडिगेरी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी जोरदार प्रचारात उतरले आहेत. सेक्टर १२ परिसरातील सर्व सोसायट्या आणि वसाहतींमध्ये घरोघरी पोहोचून नागरिकांच्या भेटी घेणाऱ्या मडिगेरींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अनेक महिला भगिनी त्यांचे औक्षण करून स्वागत करत आहेत. मागील अनेक वर्षांपासूनच्या भक्कम सोबती आणि कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख लाभली असल्याने ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. प्रभागातील प्रत्येक नागरिक त्यांना ‘आपलाच माणूस’ म्हणून पाठिंबा देताना दिसत आहेत.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यापासून मडिगेरींचा प्रचार वाढवला असून, जनतेच्या आणि माता भगिनींच्या आशीर्वादाने व उत्स्फूर्त प्रतिसादाने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.






















Join Our Whatsapp Group