पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्रभाग क्र.१३ येथून माजी नगरसेवक सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनीताई सचिन चिखले हे दोघेही पुन्हा एकदा आपल्या ठोस कामांच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, प्रचारात त्यांनी स्पष्ट आघाडी घेतली आहे. शब्दांपेक्षा कामांवर विश्वास ठेवत त्यांनी गेल्या कार्यकाळात प्रभागातील विकासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढवला आहे.

रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, समाजमंदिरे, क्रीडांगणे आदी मूलभूत सुविधांसह नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित प्रश्नांवर सातत्याने लक्ष देत दोघांनीही “विकास सर्वांसाठी” हे धोरण प्रत्यक्षात उतरवले. विशेषतः महिलांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम, आरोग्य व शिक्षण विषयक कामांमध्ये अश्विनीताई चिखले यांचा संवेदनशील व सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला आहे. नागरिकांशी थेट संवाद, कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि विकासकामांचा ठोस लेखाजोखा यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये या चिखले दाम्पत्याविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, हे दोघे केवळ उमेदवार नाहीत तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा विश्वासार्ह चेहरा आहेत, अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. कामांची शिदोरी, पारदर्शक नेतृत्व आणि जनतेशी प्रामाणिक नात्याच्या जोरावर “शब्द नाही, काम बोलतंय” म्हणूनच चिखले दाम्पत्य आघाडीवर!” हा नारा आज प्रभाग क्रमांक १३ मध्ये जनतेच्या ओठांवर आहे.






















Join Our Whatsapp Group