पुणे (Pclive7.com):- पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानकाशेजारी असलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीचे पाडकाम पुणे महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रो स्थानकाचे गेट क्रमांक 1 आणि गेट क्रमांक 3 हे 21 ऑगस्ट 2026 ते 13 सप्टेंबर 2026 या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या कालावधीत मेट्रो प्रवाशांनी स्थानकात ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी बालगंधर्व रंगमंदिर येथील पादचारी पुलाचा तसेच शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळील तानपुरा पादचारी पुलाचा वापर करून स्थानकात प्रवेश व निर्गमन करावे.

पुणे मेट्रो प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, पाडकामाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे, असे नमूद केले आहे.




















Join Our Whatsapp Group