पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी धुमधडाक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे. चिंचवड स्टेशन, साईबाबानगर, दवाबाजार, मोहननगर, सर्व्हे नंबर १३५ परिसरात मोठी पदयात्रा काढण्यात आली.

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार अनुभवी आहे. त्यांना प्रभागातील समस्यांची जाण आहे. जनतेत मिसळतात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असतात. सुख, दुख:त सहभागी होतात. त्यामुळे नागरिकांचा पाठिंबा वाढत असून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. चिंचवड स्टेशन, साईबाबानगर, दवाबाजार, मोहननगर, सर्व्हे नंबर १३५ परिसरात मोठी पदयात्रा काढण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.






















Join Our Whatsapp Group