पुणे (Pclive7.com):- पुणे शहरातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत माजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी आज (दि.२६) काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील दादर येथील टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

प्रशांत जगताप यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटासोबत पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करण्याच्या हालचालींमुळे आपण अस्वस्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

शिवसेनेचे फोन, पण काँग्रेसचाच निर्णय
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जगताप यांना शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून संपर्क साधण्यात आला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या फोन करून आपल्या पक्षात येण्याचे आवाहन केले होते. मात्र, आपण काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवतो, असे स्पष्ट करत जगताप यांनी काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
























Join Our Whatsapp Group