पिंपरी (Pclive7.com):- पूर्णानगर येथील सोनाली झोळ या संगणक अभियंता असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या G-20 परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना मिळाला असून, याशिवाय नासा (NASA) ची सदस्य होण्याचा गौरवही त्यांच्या नावावर जमा झाला आहे.

सोनाली झोळ यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत त्यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सोनाली झोळ यांच्या यशाचे कौतुक करत, त्यांच्या कार्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारी ही पूर्णानगरची कन्या परिसराचा अभिमान असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
























Join Our Whatsapp Group