पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या दुर्दशेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकप्रिय बालनाट्य ‘अलबत्या गलबत्या’च्या कलाकारांनी नाट्यगृहातील विविध असुविधांबाबत थेट प्रेक्षकांसमोर नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक नाट्यगृहांची दुरावस्था हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, याचा फटका कलाकार आणि रसिक प्रेक्षकांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक कलाकारांनी वेळोवेळी आवाज उठवला असला तरी संबंधित सांस्कृतिक विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून अपेक्षित उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

‘अलबत्या गलबत्या’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान कलाकारांनी नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधा, तांत्रिक अडचणी आणि देखभालीच्या अभावामुळे होणाऱ्या गैरसोयींचा उल्लेख केला. तसेच, या समस्यांबाबत प्रेक्षकांनीही आवाज उठवावा आणि प्रशासनापर्यंत हा प्रश्न पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कलाकारांच्या या भूमिकेमुळे रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या देखभाल व सुविधा सुधारण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, याकडे महापालिका प्रशासन आणि सांस्कृतिक विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.




















Join Our Whatsapp Group