पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार शरद गायकवाड यांनी निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून मतदारांच्या गाठीभेटींवर विशेष भर दिला आहे. तरुण वयातच सामाजिक कार्यातून त्यांनी प्रभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या कार्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

गायकवाड यांनी कस्पटे वस्ती, पीसीएमसी शाळा परिसर, मानकर चौक, छत्रपती चौक आदी भागात घराघरांत जाऊन मतदारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नागरिकांच्या दैनंदिन समस्या, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते व सुरक्षिततेबाबतच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या.

पिंपळे निलख प्रभागाला ‘स्मार्ट प्रभाग’ म्हणून विकसित करण्याचे स्पष्ट व्हिजन शरद गायकवाड यांनी मांडले. चांगल्या दर्जाचे रस्ते, भाजी मंडई, क्रिकेट ग्राउंड, मुबलक पाणीपुरवठा, दर्जेदार शैक्षणिक संस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे अशा सर्व आवश्यक सुविधा प्रभागातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
त्यांच्या या थेट संवाद आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत असून, प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






















Join Our Whatsapp Group