पिंपरी (Pclive7.com) : तेलंगणा राज्यातील महेबुब नगर येथे होणाऱ्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी कु. वेदांत संदीप कानपिळे याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेदांत कानपिळे याचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिव राजू कोतवाल, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, सदस्य डॉ. मृदुला महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा शिक्षिका पार्वती बाकळे व ऐश्वर्या साठे यांनी वेदांतला मार्गदर्शन केले. तसेच अक्षरा इंटरनॅशनल स्कूलचे संचालक जयेश राठोर व ज्योती राठोर यांनी वेदांतला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
वेदांत कानपिळेच्या या यशामुळे त्याचे कुटुंब, शाळा तसेच पिंपरी-चिंचवड शहराचा क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढला असून भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे.






















Join Our Whatsapp Group