पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी (दि.२३ ऑगस्ट) तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची पाहणी करणार आहेत. या पाहणी दौऱ्याची सुरुवात तळेगाव दाभाडे येथून दुपारी २ वाजता होणार असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना उपनेते श्रीरंग बारणे यांनी दिली.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महत्त्वाच्या औद्योगिक मार्गावरील वाहतूक, रस्त्यांची स्थिती तसेच विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घेतला जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते परिसरातील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, मागण्या आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.

या मार्गावरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तसेच वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group