पिंपरी (Pclive7.com):- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था यांच्या वतीने वल्लभनगर आगार, पिंपरी-चिंचवड येथे जादा एस.टी. बसगाड्या सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी अधिक बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच खेड तालुक्यातील वडगाव मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू करावी आणि चोरवणे मार्गासाठी विशेष जादा बसगाड्यांची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव नंदकुमार महाडिक, कार्याध्यक्ष अंकुश चव्हाण, मार्गदर्शक गजानन भाऊ मोरे, उद्योजक ज्ञानेश्वर कदम, माजी अध्यक्ष संदीप साळुंखे, रुपेश मोरे, सुरज उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

निवेदन स्वीकारताना वल्लभनगर आगार प्रमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गणेशोत्सवानिमित्त जादा बसगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. या मागणीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





















Join Our Whatsapp Group