पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक ८९ मध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्त्या निशा दिनेश यादव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत, आवडी-निवडी तसेच भविष्यातील ध्येयांविषयी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश निशा यादव यांनी दिला.
विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी व त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघनसर, युवराज पवार, मनिषा पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




















Join Our Whatsapp Group