पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, फुलेनगर हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसमय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय संकल्प रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. प्रचंड जनसमुदाय लोटला होता. विशेष म्हणजे महिलांची मोठ्या संख्येने उपस्थितती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार अनुभवी आहे. या उमेदवारांची विजयी संकल्प रॅली मोहननगर, रामनगर, फुलेनगर, काळभोर नगर परिसरात रविवारी रात्री काढण्यात आली. या रॅलीला प्रचंड प्रचंड जनसमुदाय लोटला होता.

पदयात्रेत प्रचंड जनसागर उसळला होता. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. फटाक्यांची आतषबाजी, तरुणांईची जोरदार घोषणाबाजी यामुळे प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, फुलेनगर परिसर पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसमय झाला होता. या प्रभागात घड्याळाचे वादळ घुमले आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

























Join Our Whatsapp Group