मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित सोहळा संपन्न होणार
पिंपरी (Pclive7.com):- प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतीक असलेल्या लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या ‘शक्तिस्थळ’ या प्रेरणास्थळाचे लोकार्पण गुरुवार, दि.०१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. पिंपळे गुरव गावठाण येथील मारुती मंदिराजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे.

लोकसेवेचा वारसा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे ‘शक्तिस्थळ’ हे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याची आठवण कायमस्वरूपी जपणारे केंद्र ठरणार आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्यातून समाजाला मिळालेली दिशा आणि प्रेरणा या शक्तिस्थळातून अधोरेखित केली जाणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार, कुटुंबीय, मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांची स्मृती जपणाऱ्या या शक्तिस्थळाच्या साक्षीदार होण्याचे आवाहन आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group