पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. थेरगाव येथील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब उपस्थित राहून मतदान केले.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे आणि पुतणे निलेश बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यामुळे ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. शिवसेनेचे एकूण ६० उमेदवार यावेळी महापालिका निवडणूक लढवत असून या निवडणुकीत खासदार बारणे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभर झालेला विकास तसेच पिंपरी-चिंचवडकरांसाठी घेण्यात आलेले महत्त्वाचे विकासात्मक निर्णय यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
























Join Our Whatsapp Group