पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील मतदान केंद्र क्रमांक ४९ येथे मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद राहिल्याची घटना समोर आली आहे. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनवरील काही बटणे प्रेस होत नसल्यामुळे मतदान प्रक्रिया काही काळ थांबवावी लागली.

मनसेचे उमेदवार सचिन चिखले यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तांत्रिक अडचणीमुळे मतदारांना मतदान करता येत नव्हते. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली, अशी माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
























Join Our Whatsapp Group