पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने उद्या मंगळवार (दि.०३) रोजी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगण, मुंबई–पुणे हायवे, पिंपरी येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा अस्थिकलश दर्शनानंतर देहू येथील इंद्रायणी नदीत विधिवत विसर्जित करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group