पिंपळे सौदागर (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या स्मरणार्थ पिंपळे सौदागर येथे भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

शिवशंभो सेवा मंडळ, समस्त ग्रामस्थ पिंपळे सौदागर व श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे मित्र परिवार यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महादेव मंदिर, पिंपळे सौदागर येथे ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

स्व. अजितदादा पवार यांनी आपले नेतृत्व, धैर्य आणि जनसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पिंपळे सौदागर येथील सर्व ग्रामस्थ, शिवशंभो सेवा मंडळाचे पदाधिकारी, तरुण वर्ग तसेच महिला व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शोकसभेस उपस्थित सर्वांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.






















Join Our Whatsapp Group