मुंबई (Pclive7.com):- राधाबाई साळुंखे नावाच्या महिलेने आज सकाळी मंत्रालयसमोर स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटना ऐन कामाच्या वेळेत असा प्रकार घडल्याने सगळेच भयभीत झाले होते.
जमिनीचा निकाल राधाबाई साळुंखे यांच्या विरोधात लागल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मंत्रालय सुरक्षा विभागाने तात्काळ सदर महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. संबंधित महिलेला ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले आहे.