पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौक परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री ट्रान्सफॉर्मरमधून अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर येऊ लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तत्काळ सतर्कता दाखवत संबंधित विभागाला माहिती दिली. स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे आणि तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग लागल्यामुळे काही काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. घटनेनंतर वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली आणि वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. या घटनेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.





















Join Our Whatsapp Group