पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरावरील स्वाईन फ्लूचे ‘विघ्न’ काही करून दूर होत नाही. आज मोशी येथील ४३ वर्षीय पुरूषाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालायं, तर ७ रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. यावर्षातला हा २१ वा बळी असून शहरावर भितीचे सावट आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील ४३ वर्षीय पुरूषाला दि.२५ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती खालावल्याने अखेर उपचारा दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला असून जानेवारीपासून बळींची संख्या २१ वर पोहचली आहे. दरम्यान आज स्वाईन फ्लूची लागण झालेले ११ रूग्ण आढळल्याने सर्वत्र भितीचे वातावरण आहे.
जानेवारीपासून शहरातील तब्बल ९ लाख १३ हजार २९० रूग्णांनी तपासणी करून घेतली. तर ७ हजार १८२ रूग्णांना टँमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. शहरातील विविध रूग्णालयात २९ स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ११ रूग्ण अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत.






















Join Our Whatsapp Group