पिंपरी (Pclive7.com):- संगमनेर येथून तब्बल १ टन गोमांस विक्रीसाठी मुंबई येथे घेऊन जात असलेला टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवडमध्ये पकडून दिला आहे. कै.आप्पासाहेब चिंचवडे चौकात, चिंचवड पोलीसांच्या मदतीने सापळा रचून रविवारी पहाटे हा टेम्पो पकडण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दि.७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत संगमन्र येथून गोमांसने भरलेला पूर्ण पत्र्याची बॉडी असलेला टेम्पो (क्र. MH.03.CP.3686) येणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. गोरक्षकांनी कै.आप्पासाहेब चिंचवडे चौक येथे साफळा रचून हा टेम्पो थांबवला. आणि पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सर्व माहिती देऊन पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलीसांनी टेम्पो ताब्यात घेतला. पोलिसांनी ड्रायव्हर मोहम्मद तन्वीर यकीन अली शेख व क्लिनर मोहम्मद जमाल गफूर कुरेशी यांचीकडे चौकशी केली असता, त्यांनी संगमनेर गावात मोसीन (नाव पत्ता माहीत नाही) याने शेतामध्ये गोमांस टेम्पोत भरून मुंबई येथील शहनवाज कुरेशी यांच्याकडे घेऊन जात आहे असे सांगितले. त्यानंतर पोलीसांच्या समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे व शिवशंकर स्वामी यांनी गाडीची तपासणी केली. त्यावेळी एकून १ टन वजनाचे गोमांस असल्याचे दिसून आले.
कसायांना सहकार्य करणाऱ्या शेतकाऱ्यासह गोमांस कापणारा मोसीन, गोमांस विकत घेणारा शहनवाज कुरेशी, ड्रायव्हर व गाडी मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवशंकर स्वामी (मानद पशुकल्याण अधिकारी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
यावेळी बजरंग दलाचे मंगेश नढे, उपेंद्र बलकवडे, अभिजित चव्हाण, आशुतोष कदम, यशंवत कर्डिले, कुणाल साठे, अभिजीत शिंदे, गौरव पाटील, ओंकार मानकर, महेश शर्मा, योगेश चिंचवडे, निखील भालके, धनंजय गावडे, गणेश गावडे, पराग ढोरे आदी गोरक्षकांनी या कारवाईत सहभाग घेतला.