पिंपरी (Pclive7.com):- मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, युती झाली आणि तिकीट मिळाले नाही तर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप भाजपला ‘रामराम’ ठोकून राष्ट्रवादीत जाणार या चर्चा केवळ चर्चाच असल्याचे स्पष्ट झालयं. भाजपा व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढविणार नाही असे जगताप यांना जाहिर केलयं.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना चांगलाच ऊत आलायं. मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही तर, युती झाली तर, पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीकडून मावळची लोकसभा लढणार अशी देखील जोरदार चर्चा सुरू झालीयं. मात्र या सर्व चर्चांना स्वत: आमदार लक्ष्मण जगताप यांनी पूर्णविराम दिलायं. भाजपा व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढविणार नाही असे जगताप यांना जाहिर केलायं. अशा आशयाची पोस्ट लक्ष्मण जगताप यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आलीयं.
गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभा उमेदवारी वरून पिंपरी चिंचवड मधले वातावरण आता चांगलेच तापले आहे. आधी पार्थ पवार यांची उमेदवारी, त्यानंतर लक्ष्मण जगताप यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. आता जगताप यांनी भाजपाकडूनच निवडणूक लढविणार असल्याचे जाहिर केल्याने युती न झाल्यास मावळच्या रिंगणात ते स्वत: उतरणार असल्याचेही स्पष्ट संकेत मिळाले आहेत.