पिंपरी (Pclive7.com):- देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या तळवडे गावातील स्मशानभूमीजवळ २५ ते ३० वर्षाच्या तरूणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी हा सर्व प्रकार समोर आला असून मृत तरूणाची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार तळवडे गावाच्या स्मशानभूमीजवळ आज सकाळी तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर जखमा असल्याचे दिसून येत असून शेजारीच मोठा दगड आढळून आला आहे. त्यामुळे दगडाने ठेचून खून झाल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी पोहचले अाहेत. गेल्या तीन दिवसांत या परिसरात खूनाची दुसरी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीसांनी याप्रकरणी तपासासाठी पथके रवाना केली असून पुढील तपास सुरू आहे.