पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेच्या शिरुर महिला जिल्हा संघटकपदी माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. तर, भोसरी मतदारसंघाच्या महिला संघटकपदी वेदश्री काळे यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भोसरी विधानसभा मतदार संघातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
सुलभा उबाळे या माजी नगरसेविका आहेत. त्यांनी पिंपरी महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद देखील भूषविले आहे. शिवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख असून त्या जुन्या कार्यकर्त्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहर महिला आघाडीच्या संघटिका म्हणून त्यांनी काम केले आहे.
आता त्यांच्याकडे जिल्हा संघटकपदाची जबाबदारी आली आहे. उबाळे यांची शिरुर महिला जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली असून भोसरी, खेड आणि शिरुर या मतदार संघाची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.