पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग समितीच्या मासिक बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित राहणार नसतील तर प्रभाग बैठका घेताच कशाला?असा सवाल विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी यांनी केला. आज बुधवारी दुपारी ‘ब’ प्रभाग क्षेत्रिय कार्यालयात प्रभाग समितीची मासिक बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीला प्रभाग समिती अध्यक्ष करूणा चिंचवडे, नगरसेविका नीता पाडाळे, उषा काळे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर आदी नगरसदस्य उपस्थित होते.
दर महिन्याला प्रभाग स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येते, त्यामध्ये प्रभाग स्तरावरील विविध विषयांवर चर्चा केली जाते. प्रभागात काय कामे सुरू आहेत, काय समस्या आहेत यासारख्या अनेक लहान मोठ्या विषयांवर सविस्तर चर्चा होते. परंतु त्या बैठकिला संबंधित अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असतांना देखील अनेक वेळा अधिकारी उपस्थित राहत नाहीत, मग बैठक बोलावून चर्चा कोणासोबत करायची असा सवाल देखील कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रभागात कचरा वेळेवर उचलला जात नाही, साफसफाई कर्मचारी उद्धटपणे बोलतात, पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, डेंग्यूची साथ असतांना औषध फवारणी होत नाही, यासारख्या अनेक प्रश्नांचा पाडा नगरसेवकांनी प्रशासनासमोर वाचून दाखविला.






















Join Our Whatsapp Group