पिंपरी (Pclive7.com):- आषाढी वारीनंतर देशभरातील वारकऱ्यांसाठी महत्वाची असलेल्या कार्तिकी वारीनिमित्त लाखो वारकरी आपल्या श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत दाखल झाले होते. सुमारे ७२२ वर्षापूर्वी माऊलींच्या संजीवन समाधीनिमित्त सुरू झालेली कार्तिक वारी आजही अविरतपणे सुरू आहे.

आषाढी वारीला पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे वारकरी हे त्याच ओढीने कार्तिकी एकादशीला आळंदीत दाखल होतात आणि भक्तीचा मळा फुलून जातो. मात्र, कार्तिकी वारीला केवळ वारकरी आणि भक्त नाहीतर साक्षात पंढरीनाथ ही येत असतात, असे कार्तिकी वारीचे महत्व आहे. कार्तिकी एकादशीनंतर सर्व वारकऱ्यांना संजीवन समाधी सोहळ्याची आस लागते. यंदाचा हा ७२३ वा संजीवन समाधी सोहळा होता. या सोहळ्यावर काही प्रमाणात दुष्काळाचे सावट असल्यामुळे वारकऱ्यांची गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकरी माऊलींच्या आशीर्वादाबरोबरच पाणी बचतीचा संदेशही सोबत घेऊन जात आहे, असे महाराज शास्त्री यांनी बोलताना सांगितले.
कार्तिक वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळानिमित्त दाखल होणारे वारकरी आणि त्यांचा उत्साह हा देखील महाराष्ट्राच्या संत परंपरेचा एक वैभव आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे आळंदी देवस्थान प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील म्हणाले.






















Join Our Whatsapp Group