पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी प्रभाग क्र.२१ येथील माध्यमिक विद्यालय, पिंपरीनगर मधील १७ वर्षे वयोगटातील मुलींनी इंद्रायणीनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविल्याबद्दल नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने प्रोत्साहनपर क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच माध्यमिक विद्यालय येथील क्रिडांगण विकसित करुन या ठिकाणी खोखो, कबड्डी, फुट्बॉलचे मैदान संदीप वाघेरे यांच्या मार्फत पाठपुरावा करुन विकसित करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जी.के. कुलकर्णी, क्रीडा शिक्षक ए.एच.शिंदे, गुंजेगावकर, भुजबळ, भोसले, चपटे, फळे, केदार, केणे आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय गायके, राजेंद्र वाघेरे, रुपेश वाघेरे, हरिश वाघेरे, युवराज वाघेरे आदी मान्यवर उपस्थित होते
























Join Our Whatsapp Group