पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारीसंघ व लहुजी शक्तीसेना पिंंपरी चिंचवड शहराच्या वतीने क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तत्पूर्वी काश्मीरमधील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या हस्ते क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, भाग्यश्रीताई म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, गोरख पाटील, दत्ता गिरी, सागर गायकवाड, दत्ता क्षिरसागर, सुरेश जोगदंड, दिपक चखाले, माऊली जाधव, आशिष वाळके, दिपक कांबळे, गणेश पाडुळे, रविकिरण घटकार, सतिष भवाळ, गणेश आडागळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.