पिंपरी (Pclive.com):- जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवानांना
थेरगाव येथील संजीवनी मित्र मंडळाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
संजीवनी मित्र मंडळाकडून रविवार दि.१७ रोजी कँडल मार्च काढून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश कसबे, मंडळाचे आधारस्थंभ गणपत मदगे, उपाध्यक्ष अजय केवट, तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी संजीवनी मित्र मंडळ ते थेरगाव येथील शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला.