पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ६ हजार १८३ कोटी १३ लाख रूपयांचा केंद्राच्या योजनेंसह अर्थसंकल्प स्थायी समिती सभेपुढे सादर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा अर्थसंकल्प स्थायी सभापती ममता गायकवाड यांच्याकडे सादर केला.
यावेळी स्थायी समिती सदस्य राजेंद्र गावडे, विलास मडेगिरी, करूणा चिंचवडे, नम्रता लोंढे, सागर आंगोळकर, अमित गावडे, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, नगरसचिव उल्हास जगताप उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे ३७ वे अंदाजपत्रक आहे. तत्पुर्वी सभेच्या सुरूवातीला काश्मिर हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहून सभा १० मिनिटे तहकूब करण्यात आली होती.
अंदाजपत्रकातील विशेष वैशिष्ट्ये..
* नदी सुधार प्रकल्प २०० कोटी (कर्ज रोखे)
* मेट्रो प्रकल्पाकरिता ५ कोटींची तरतूद
* आंद्रा भामा-आसखेड करिता २८ कोटी तरतूद
* भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेप्रेटर, उड्डाणपूलासाठी ३५ कोटी ५२ लाख रूपयांची तरतूद
* भोसरी पांरजरोळ चौक ते चऱ्होली लोहगाव मनपा हद्दीपर्यंतचा विकास आराखडा विकसित करण्यासाठी ५२ कोटी ६३ लाख रूपयांची तरतूद.
* रावेत बंधारा सक्षमीकरणासाठी ५ कोटी ७५ लाख रूपयांची तरतूद
* बीआरटीसाठी पर्यावरणपूरक ग्रीन बसेस खरेदीसाठी १० कोटींची तरतूद