आळंदी (Pclive7.com):- छावा संघटना आणि चला वारीला टीम यांच्या माध्यमातुन आयोजित “वारी स्वच्छतेची पवित्र इंद्रायणीची” अभियान मोठ्या संख्येंने पार पडले. यावेळी इंद्रायणी नदी मधील मैला, निर्माल्य, कचरा, प्लास्टीक, कपडे व इतर अस्वच्छ पदार्थ बाहेर काढण्यात आले. या स्वच्छता मोहीमेमध्ये तरुण, तरुणी, महिला आणि अबालवृद्धांनी परिसर स्वच्छ करत नदीमध्ये उतरुन ९ ट्रॅक्टर भरुन कचरा काढण्यात आला.

या सर्वांना छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की “नदी स्वच्छता ही पर्यावरण समतोल साधण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. नदी मधील प्रदूषण ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात आषाढी वारीसाठी भाविक भक्तांच्या काळजीच्या हेतूने आम्ही इंद्रायणी स्वच्छ केली आहे. केवळ येथेच न थांबतां ही एक जनचळवळ व्हावी अशी इच्छा आहे.”

या मोहीमेत पिंपरी चिंचवड व पुणे भागातील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर हिमगिरीयन्स, लुंकड रिॲलिटी ग्रुप, लोकराज्य संघ व इतर सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष अमोल वीर, महाराष्ट्र सल्लागार मच्छिंद्र चिचोंले, किरण रजपुत, हनी थाेरात, शशिकांत मुळे, समीर वीर, राम सुर्यंवशी, व छावा संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group