पिंपरी (Pclive7.com):- मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा परिसरात तब्बल ३७५ मिलीमिटर पावसाची नोंद झालीयं. सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे थेरगाव येथील केजूबाई बंधारा, पुनावळे येथील बंधारे ओसंडून वाहत आहेत. पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली असून चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले आहे.

कालपासून पावसाची संतधार सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण ५५ टक्क्यांपर्यंत भरले आहे. शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या विविध भागात पाणीच पाणी झाले आहे. पवना नदीतील पाण्याच्या पातळीत जोरदार वाढ होत आहे.
थेरगाव येथील केजूबाई बंधारा तुडूंब भरून वाहू लागला आहे. तसेच पुनावळे येथील बंधाराही ओसांडून वाहत आहे. त्यामुळे चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदीरात पाणी शिरले आहे. तर शेजारीच असलेल्या स्मशानभूमीतही मोठ्या प्रमाण पाणी साचले आहे. कालपासून संततधार सुरू असल्यामुळे पाणी शिरले असून परिसरातील नागरिक हे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू लागलेत.






















Join Our Whatsapp Group