पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील गणेशम फेज-२ येथे गणेशम शक्ती महिला बचतगट व गणेशम आकृती महिला बचतगटाचे उद्घाटन आज करण्यात आले. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.
यावेळी संजय गांधी योजना समिती महाराष्ट्र शासनच्या सदस्या अदिती निकम यांनी उपस्थित असलेल्या महिलांना योजने विषयी मार्गदर्शन केले. यावेळी आरती जोंधळे, तनुजा भोई, सपना राजपुत, सोनाली अनंतवाट, आरती येवले, सोनाली गंधर व सोसायटीचे सेक्रेटरी प्रदीप बुटडा, दीपक कोल्हे व इतर मान्यवर उपस्थित होते.