पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २६ वाकड-पिंपळे निलख प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आला. दहावी आणि बारावीत सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना टॅब भेट देऊन सन्मान करण्यात आला. तर या परिक्षेत यशस्वी झालेल्या दिडशेहून अधिक विद्यार्थांना सत्कार यावेळी करण्यात आला. भाजपाचे नगरसेवक संदिप कस्पटे यांच्यावतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नगरसेवक संदिप कस्पटे यांच्या कार्यालयात ह्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका आरतीताई चोंधे यांच्यासह परीसरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.