पिंपरी (Pclive7.com):- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाच्या निमित्त मंदिरात फक्त धार्मिक विधी करण्यात आल्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या आदेशानुसार मंदिरात कोणीही दर्शनाला जाऊ नये किंवा गर्दी करू नये म्हणून फक्त पुजारी आणि एक दोन प्रतिष्ठानचे सदस्य यांच्या हस्ते महारांजाचा अभिषेक आणि होम पूजा व आरती करण्यात आली.
मंदिर भाविकांसाठी बंद आहे. परंतु भाविकांना घरी बसल्या स्वामींचे दर्शन घेता यावे यासाठी सर्व विधी हे फेसबुक लाईव्ह करण्यात आले. यावेळी सध्या जगावरती, व आपल्या भारत देशावरती जे कोरोना विषाणुचे संकट आले आहे. ते लवकरात लवकर दूर कर असे स्वामीकडे प्रार्थना करण्यात आली. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, मंगेश पाटील, मेघराज बागी, विनीत साळी, अंजली देव, अक्षदा देशपांडे हे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group