तळेगाव (Pclive7.com):- भारतात कोरोनाचे विषाणूचे संकट ओढवले असल्याने संपर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. कुणालाही घराबाहेर निघता येत नसल्याने ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांना याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. जर कामावर गेले तर संध्याकाळचे जेवन मिळेल अशा या बांधवाना एक मदतीचा हात म्हणून राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे सहकारी साजिद शेख, उद्योजक सोहेल शिकीलकर, इरफान नालबंद यांनी पुढाकार घेऊन तळेगाव दाभाडे गावातील गरजू कुटुंबाना तांदुळ, पीठ, डाळ, हळद, तेल, साखर, मिरची अशा जीवनावश्यक असणाऱ्या विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आम्हाला अभिमान आहे आम्ही भारत देशात राहतो कुठलीही जात-पात न पाहता प्रत्येक गरजू कुटुंबाना मदत देण्याचा आमचा संकल्प असून ज्याला जे शक्य होईल तशी मदत करून देशसेवेत सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी केले. यावेळी मुस्लिम समाजातील सर्व युवक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group