पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तृतीयपंथी यांचा सन्मान करण्यात आला.
‘सन्मान माणुसकीचा’ या उपक्रमाअंतर्गत प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देवून अमित बाबा, कीरण म्हस्के, करीश्मा म्हस्के, स्वरा जाधव, चिंगी जाधव, किरण वाघ-म्हस्के, समीरा खान, निकिता मख्यदल, मधुताई जगताप, मारीया म्हस्के, पुष्पा म्हस्के या तृतीयपंथी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, फझल शेख, विजय लोखंडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, गंगा धेंडे, नेहा पडवळ, अपर्णा मिसाळ, विद्यार्थी शहराध्यक्ष यश साने, मनिषा गटकळ, आशा शिंदे, अमोल भोईटे, अकबर मुल्ला, बाळासाहेब पिल्लेवार,गोरोबा गुजर, विजया काटे, सुप्रिया काटे, हिना अत्तार, झहिर खान, रूपाली माईमकर, सारिखा ढमे, अश्विनी पवळ, फातिमा अन्सारी, अभिषेक अल्हाट, ज्योती शिंदे, विनय शिंदे, माधव पाटील, पल्लवी पांढरे, साहुल शेख, बाळासाहेब जगताप, महेश झपके, निर्मला माने उपस्थितीत होते.
युवती अध्यक्षा वर्षा जगताप म्हणाल्या, आजच्या आधुनिक आणि प्रगतीशील काळातही पूर्वग्रहदूषित गैरसमजांना तृतीयपंथी लोक सामना करत आहेत. सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जात आहेत. त्यांना समाजात माणूस म्हणून नवीन ओळख मिळावी. यासाठी दूरदृष्टी ठेवत शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी LGBT या सेलची स्थापना केली आहे. त्या सेलच्या माध्यमातून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहे.