पिंपरी (Pclive7.com):- दत्ता काका साने स्पोर्ट्स फाऊंडेशन व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश दत्ता काका साने यांच्यातर्फे युवा खेळाडूंला आर्थिक मदत करण्यात आली आहे.
कब्बडी मॅच खेळतांना जखमी झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर कब्बडीपटू कु.राधा विलास मोरे हिला यश दत्ता काका साने यांच्यातर्फे रोख दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली.
राधा ही ज्युनिअर नॅशनल खेळाडू असून तिने खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तिचे वडील आरोग्य खात्यात कामाला आहेत. खेळताना जखमी झाल्यामुळे राधा हिला तातडीच्या उपचाराची गरज होती.
परंतु आर्थिक परिस्थतीमुळे उपचार करण्यात अडचण येत होती. यश दत्ता काका साने यांच्यातर्फे आर्थिक मदत करण्यात आली आहे.