पिंपरी (Pclive7.com):- कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दत्तमंदिर सांस्कृतिक हॉल, संभाजीनगर, चिंचवड याठिकाणी दि.२३ जून २०२४ रोजी हा कार्यक्रम पार पडला.
प्रतिकुल परिस्थितीतून मोठ्या मेहनतीने प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा या अनुषंगाने कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रूपेश मोरे व पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित कामगार नेते, शहराध्यक्ष काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा डॉ. कैलासभाऊ कदम, माजी नगरसेविका महिला शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी सौ. सुजाताताई पालांडे, कॅप्टन श्रीपत कदम, अशोक कदम, प्रदीप सकपाळ, विजय निकम, मनोहर यादव तसेच कोकण खेड युवाशक्ती सर्व सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप कदम सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन अंकुर चव्हाण यांनी केले.























Join Our Whatsapp Group