पिंपरी (Pclive7.com):- मुसळधार पावसामुळे तसेच दरड कोसळून अतोनात नुकसान झालेल्या कोकणातील महाड, तळीये, पोलादपूर, खारसगांव या पुरग्रस्त भागात जावून मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे कीट मदत म्हणून देण्यात आले.
यावेळी तळीये गावात डोंगर कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून अनेक निष्पाप नागरीक मृत्यूमूखी पडले. त्या ठिकाणी दशक्रिय विधीच्या कार्यक्रमात मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी भावना व्यक्त करताना अध्यक्ष गणेश आहेर म्हणाले की, या गावावर निसर्गाचा फार मोठा प्रकोप झाला आहे. यातून सावरण्यासाठी संबंध महाराष्ट्र या ग्रामस्थांच्या पाठीशी उभा आहे. मात्र या दुर्घटनेत जी जीवितहानी झाली. त्याचं दुःख कधीही भरून येणार नाही. तरीही आम्ही या मदतीच्या माध्यमातून एक छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
या वेळी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दानशून व्यक्तींनी एक हात मदतीचा पूढे करत ही मदत पुरग्रस्तांना पोहच करण्यात आले.
या सेवेसाठी सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख, गणेश आहेर, धनराजसिंग चौधरी, सुदर्शन देसले, विशाल वाली, सूशिल मल्ले, गणेश चाटणे, गोरख पाटील, गणेश पाडूळे, माऊली जाधव, बाळासाहेब गायकवाड, भरत इंगळे, प्रदिप दळवी, रविकिरण घटकार, डाॅ.अभय कुलथे, विष्णू साळवे, दत्ता गिरी, अंकुश कोळेकर, महेश गुळगोंडा, मारूती म्हस्के, नरसिग माने, गणेश वाळुंज, अभय खामकर, सचिन साळवी, मंगल शिंगारे, नारायण खूशलानी, उमेश भायानी, लक्ष्मण, रामू चंयन्दास, सचिन छपरीबंद यांनी सहकार्य केले.
























Join Our Whatsapp Group