पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड अॅम्ब्युलन्स असोसिएशन व ओम साई अॅम्ब्युलन्स सर्व्हिस काळेवाडी फाटा यांच्या माध्यमातून महाड व चिपळूण येथे पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्नदानाची मदत पाठविन्यात आली आहे.
पाच रुग्णवाहिका भरून आज (दि.०५) सायंकाळी संघटनेच्या सर्व पदाधिकार्याच्या उपस्थितीत हा ताफा रवाना झाला. संकटकाळी, एक हात मदतीचा, हे संघटनेचे धोरण आहे.
यावेळी संघटनेचे सचिव श्री. संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या सर्व गाड्या महाड व चिपळूण या गावी रवाना झाल्या. या वेळी श्री. मोहन चव्हाण, श्री. हेमंत देशमुख, श्री. चिराग मित्तल, श्री. जोतिबा शिंदे, श्री. कृष्णा सूर्यवंशी, श्री. राकेश चंदनशिवे, श्री अक्षय चिमले, श्री. नरेश जोशी, श्री. बिरु मनावर हे संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group