पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी येथील स्व.सुरदासजी गायकवाड सोशल फाऊंडेशनच्या वतीने कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात संततधार पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र विभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरमध्येही पुरामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या पूरग्रस्तांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका संध्याताई सुरदास गायकवाड सरसावल्या आहेत. त्यांच्या बरोबरच सौ.रेखा पटेल, सचिन अवघडे, विश्वजीत हाके, प्रतिक पटेल, कुणाल जाधव, जयराज गायकवाड व नागरिक हे मदतीला आले आहेत.

या पूर परिस्थितीमुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले. अनेक नागरिक अडचणीत आलेत. लहान मुलांचे, अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्तांच्या मदती करिता स्व. सुरदासजी गायकवाड सोशल फाउंडेशनच्या वतीने मुबलक असे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत.
या पूरग्रस्तांच्या मदतीकरिता दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फुगेवाडीतील ग्रामस्थ व युवा तरुण पिढी यांनी पूरग्रस्तांसाठी भरपूर मदत केली. त्यांचे या निमित्ताने माजी नगरसेविका संध्याताई सुरदासजी गायकवाड यांनी आभार व्यक्त केलेत. तसेच यापुढेही दानशूर व्यक्तीने पूरग्रस्तांसाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
























Join Our Whatsapp Group