पिंपरी (Pclive7.com):- नवी सांगवीतील कार्यकर्त्यांनी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत तुम्हाला योग्य प्रकारे न्याय मिळेल, असे आश्वासन खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
नवी सांगवी येथील प्रशांत कडलग ,मंगेश लोखंडे,महेश पांचाळ, तृप्ती चव्हाण, विनोद लोखंडे, राज लोखंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला.
थेरगाव येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्याला सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, युवासेना प्रमुख विश्वजित बारणे, विजय साने, सिकंदर पोंगडे, स्वरूपा खापेकर, दीपक ढोरे, प्रकाश घोरपडे, चेतन शिंदे, माऊली जगताप, राजेश तरस, अमित निंबाळकर, अमित सुरवसे, मोहन बारटक्के, अतुल पोंगडे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, ”आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्यास पसंती देत आहेत. कार्यकर्त्यांना शिवसेनेत योग्य प्रकारे न्याय मिळेल. कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढेल. त्याचा निवडणुकीत शिवसेनेला नक्कीच फायदा होईल. महापालिकेतील सत्ताधा-यांच्या चुकीच्या कारभारावर मतदार प्रचंड नाराज आहेत”.






















Join Our Whatsapp Group