पिंपरी (Pclive7.com):- चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ पुणेचे विभागीय संचालक महेश धर्माधिकारी यांनी शिक्षकांना ‘नव्या शिक्षण प्रणालीशी समरस व्हा’ असे सांगितले.
शिक्षण म्हणजे समजणे, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणे, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणे, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणे, शिक्षण म्हणजे चांगले माणूस होणे, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणे, हे जाणून ज्यांनी शाळा व शिक्षण यांवर अनेक प्रयोग केले त्या शिक्षकांचा आज शिक्षक दिन.
विद्येची देवता सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळा व्यवस्थापनाच्या वतीने महेश धर्माधिकारी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महेश धर्माधिकारी यांनी शिक्षक आणि शिक्षकांची जबाबदारी यांची आठवण करून दिली. शाळेमध्ये गेली दोन वर्षे उत्कृष्टपणे ऑनलाईन सुरू असलेल्या अभ्यासक्रमास, विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमास, विद्यार्थ्यांच्या सर्वगुणसंपन्न विकासास इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या व्यवस्थापनाचे सहकार्य, शिक्षकांचे योगदान, पालकांचा सहभाग लाभला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
धर्माधिकारी यांनी इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या देबोश्री भोंडवे, दिशा कंसारा, चंद्रकला कापरी, निशा पाटील, प्रीती साबने, कृष्णा राणा, अदिती एकवडे, प्रेमलता केंजळे, तन्वी नाशिकर, अनुराधा डिक्कर, रोहिणी भोसले, तमाळी डे, निरुपमा काकडे, संसिया लूद्राज, सुजाता शेलार, सिद्धी सावंत, कल्याणी साजन, तेजश्री शिंदे, शोभना सिंग आणि पुष्कर कापरी आदी शिक्षिकांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.
आम्ही सर्वांत मजबूत समूह आहोत. आम्ही शिकवित असलेल्या विद्यार्थ्यांच्या समुदायाला आकार देऊन आपल्या बांधिलकी आणि प्रयत्नांद्वारे राष्ट्राचे भविष्य घडवण्यात योगदान देऊ शकतो. हे शिक्षकांनी कधीही विसरू नये. एक शिक्षक शिक्षकांची जबाबदारी पूर्ण समर्पणाने, प्रामाणिकपणे पार पाडू शकतो आणि तुमच्यापैकी बरेच जण ते करत आहेत, असे संचालिका कमला बिष्ट म्हणाल्या.
ऑनलाईन असलेल्या या अविस्मरणीय उपक्रमाचे शिक्षकांनी नियोजन केले. सर्व पालकांनी ऑनलाईन उपस्थित राहून शिक्षकांचे कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना, शिक्षकांना प्रणाम करून, व्हिडिओ द्वारे शिक्षकांसाठी कविता, मनोगते व्यक्त केली.
शिक्षकांनी म्हटलेल्या वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group