पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के.सी.वेणूगोपाल यांनी निवडीची घोषणा केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही निवड झाल्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच याचा फायदा पक्षाला होणार आहे.
एका सामन्य कामगाराच्या कुंटूबातील कैलास कदम यांचा जन्म एच.ए. हॉस्पीटल पिंपरी येथे झाला. शिक्षण एच.ए. स्कूल येथे इंग्रजी माध्यमतून झाले. कदम यांच्या नेतृत्वात १९९७ साली पहिली महिला बिनविरोध नगरसेविका निवडून आणली गेली. २००७ साली झालेल्या पिपंरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत कदम यांच्या वहिनी सौ.निर्मलाताई कदम या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पुढे २०१२ साली ते स्वतः व त्यांचे बंधू हे वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले.
पुढे कदम यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते या व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्वाच्या पदावर काम केले. ते इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी कामगार क्षेत्रात अतिशय भरीव काम केले आहे. यांत अनेक ठिकाणी पगारवाढ करार, अनेक बेरोजगार युवकांना रोजगार देणे, कामगारांना नोकरीत कायम करणे, परदेशात विविध देशांमध्ये कामगार परिषदांना भारताच्या वतीने प्रतिनिधीत्व केले आहे. त्याच बरोबरीने त्यांनी कोकणातील असंख्य बांधवांना एकत्र करून पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोकण विकास महासंघाची स्थापना केली.
एका कामगार नेत्याला काँग्रेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देत काँग्रेस नेतृत्वाने या औद्योगिक नगरीत कामगार व काँग्रेसचे संयुक्त समीकरण करून कौशल्यपुर्ण निर्णय घेतला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पिंपरी चिचंवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निवडीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडी बाबत कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत.
























Join Our Whatsapp Group