पिंपरी (Pclive7.com):- अजितदादांसारखा असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्यानं एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं आहे अशी भावना भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि अतिशय धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अजितदादांसारखा असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्यानं एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी पहाटे सहा वाजेपासून तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते.

राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेलं योगदान हा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवील. दादांचं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
– महेश किसनराव लांडगे
आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड पुणे.






















Join Our Whatsapp Group