पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात आज (दि.१३) पहाटे दाट धुके पडले होते. ही धुक्याची झालर सकाळी उशिरापर्यंत होती. या अल्हाददायक वातावरणात मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करिता नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत होते.
पिंपरी चिंचवड शहराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली होती. आज पहाटे धुके पडले असून थंडीची चाहूल लागली आहे.
शहरातील स्मार्ट परिसर असलेल्या पिंपळे सौदागरमध्ये पहाटे दाट धुक्याची झालर पहायला मिळाली. या अल्हाददायक वातावरणात नागरिकांनी मॉर्निंग वॉक आणि सायकलिंगचा आनंद घेतला.