पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ०२ जाधववाडी चिखली मोशी भागातील नागरिकांसाठी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. मंगलताई राहुल जाधव आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या माध्यमातुन मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना राहुल जाधव म्हणाले कि कोरोनाच्या या काळामध्ये आणि बदलत्या वातावरणातील बदलामुळे लोकांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच रक्त तपासणी करण्यासाठी लोकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. आणि लॉकडाउनमुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणुन आपल्याकडून हि लोकांना काही प्रमाणात मदत करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री राहुल जाधव मंगलताई जाधव आशा आहेर संभाजी आबा घारे, महेंद्र मंडलिक बाबु जाधव गुलाब जाधव नंदकुमार जाधव बाबु वाळूजकर चिंतामणी शिंदे प्रताप भांबे इ. मान्यवर उपस्थित होते.