पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शहरात आज (शनिवार दि.०८) दिवसभरात तब्बल १,०७३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ओमिक्रॉनचे ०५ रूग्ण पॉझिटिव्ह आलेत. सातत्याने वाढणारा कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे. दरम्यान आज दिवसभरात ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज दिवसभरात १,०७३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर ०५ ओमिक्रॉनचे रूग्ण आढळलेत. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठ्या रुग्ण वाढीमुळे आज शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ४१६५ इतकी झाली आहे. यातील ३७८ रूग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ३७७८ रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
🚨 Pcmc Corona Update’s🚨
सौजन्य – Pclive7.com
पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज
शनिवार दि.०८ जानेवारी २०२२
📲 अपडेट्स सायं ०४ पर्यंतचे📲
📉 आज पॉझिटिव्ह रूग्ण = १०७३
📉 आज ओमिक्रॉन रूग्ण = ०५
📉 एकूण पॉझिटिव्ह = २८३४०२
📉 सध्या शहरात रूग्ण = ४१६५
(रूग्णालय ३७८ + क्वारंटाईन ३७८७)
📉 एकूण मृत = ४५२६ (आज = ००) (०० Pcmc, ०० हद्दीबाहेरील)
📉 एकूण कोरोनामुक्त = २७५४४१ (आज ४३ रूग्ण डिस्चार्ज)
📉 आज संशयित रूग्ण = १०२१२
📉 दैनंदिन सर्व्हेक्षण = २१८६
💉 आज लसीकरण = १२१४८
(एकूण = ३०५८९७०)
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥
Join Telegram Group👇👇